मोखाडा न्यूज | विभाजन विभीषिका दिन विशेष
मोखाडा – “जो समाज आपला इतिहास विसरतो, तो कालांतराने नष्ट होतो. त्यामुळे फाळणीच्या भयानक वेदनांमधून आपण राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवण्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन तिलका मांझी आयटीआय येथे आयोजित ‘विभाजन विभीषिका दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. साहेबराव धनवटे यांनी केले.
विभाजनाची वेदना आणि इतिहासाचा धडा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शशिराज बाविस्कर होते. यावेळी प्रकाश मार्के, कार्यालय प्रमुख संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. धनवटे यांनी १९४७ मधील स्वातंत्र्य आणि त्याचवेळी झालेल्या देश विभाजनाच्या भीषण घटनांचा उल्लेख केला.
- पाकिस्तान मुस्लिम बहुल देश म्हणून वेगळा झाला आणि भारत धर्मनिरपेक्ष राहिला.
- या विभाजनात सुमारे १० लाख निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले.
- दीड कोटी लोकांचे स्थलांतर झाले.
- ५५ लाख हिंदू व शीख महिलांचे अपहरण झाले.
- करोडो रुपयांची मालमत्ता नष्ट झाली, लाखो लोकांना ‘रिफ्यूजी कॅम्प’ मध्ये राहावे लागले.
राष्ट्रहित जपणे ही पहिली जबाबदारी
प्रा. धनवटे म्हणाले, “आज देशाने एकसंध राहण्यासाठी फुटीरतावादी प्रवृत्ती दूर ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्राची एकता आणि अखंडता ही प्रत्येक नागरिकाची पहिली बांधिलकी असावी. धार्मिक आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान आजही प्रगती करू शकलेला नाही आणि भारताशी अनावश्यक शत्रुत्व ठेवतो. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून राष्ट्रहित जपले पाहिजे.”
कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग (मोखाडा न्यूज)
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती भाविका तुंबडे, अझहर शेख, माणिक घोडके, भालचंद्र राऊत, हेमंत भोये, कमलाकर थाळेकर यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन राजेश हरळ यांनी केले, तर आभार दीपा राऊत यांनी मानले. प्रशिक्षणार्थी युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.