मुंबई: राज्यात गणेशोत्सवाच्या रंगात रंगलेल्या वातावरणात आगामी १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी व ईद-ए मिलादच्या दोन प्रमुख सणांच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टीसंबंधी नवा निर्णय घेण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
यावर्षी, अनंत चतुर्दशी व ईद-ए मिलाद यांचे महत्त्व लक्षात घेता, राज्य सरकारने ईद-ए मिलादसाठी सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. ही सुट्टी विशेषत: मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे.
ईद-ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे, ज्यामध्ये विशेष जुलूस आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची परंपरा असते, त्यामुळे या दिवशी विशेष कडक सुरक्षा उपाय योजले जातात.
राज्य प्रशासनाने शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी ईद-ए मिलादची सुट्टी १८ सप्टेंबरला देण्यात आली आहे. बुधवारी सुट्टी मिळाल्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सलग सुट्टीचा आनंद घेता येईल.
सरकारी कर्मचाऱ्यांना अनंत चतुर्दशी आणि ईद-ए मिलाद यांच्या निमित्ताने लाँग वीकेंडचा आनंद मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाद्वारे हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये सलोखा राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.