IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी निर्णायक सामना
Mumbai Indians Fan Request : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी या शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाल्या.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
साई मंदिरात दर्शनासाठी नीता अंबानींची उपस्थिती
नीता अंबानी या त्यांच्या आईसोबत शिर्डीतील साई समाधी दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी सायंकाळच्या धूप आरतीला उपस्थित राहून प्रार्थना केली. यावेळी मंदिर परिसरात असलेल्या एका चाहत्याने (Mumbai Indians Fan Request) त्यांच्याकडे विशेष विनंती केली.
“रोहितला पुन्हा कॅप्टन करा” – चाहत्याची भावना
साई मंदिरातून बाहेर पडताना, एका भाविक चाहत्याने नीता अंबानी यांना हात जोडून विनंती केली – “रोहित शर्माला पुन्हा एकदा कॅप्टन करा!”
या भावनिक क्षणी नीता अंबानी यांनी त्याला नमस्कार करत हसत उत्तर दिलं – “बाबा की मर्जी!”
आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची स्थिती
मुंबई इंडियन्स सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली आपला दुसरा हंगाम खेळत आहे. मात्र संघाला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाही. पाच सामन्यांपैकी केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
आजचा सामना निर्णायक
आजचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत असून, दिल्ली सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर मुंबई नवव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बातमी लिहीपर्यंत मुंबईने 7 ओव्हरमध्ये 1 बाद 72 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने चांगली सुरुवात केली, पण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.