Mumbai Railway Update : मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीत गोंधळ, वंदे भारतसह अनेक गाड्या रद्द

Mumbai Railway Update: Heavy rains in Mumbai cause disruption in railway traffic, many trains including Vande Bharat cancelled

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका थेट रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेने सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मनमाड: मुंबईत पावसामुळे रेल्वे विस्कळीत | Mumbai Railway Update

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे गाड्या धोकादायक ठरू नयेत म्हणून मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईहून सुटणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. यामुळे हजारो प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडले आहे.

रद्द झालेल्या प्रमुख गाड्या (१९ ते २१ ऑगस्ट दरम्यान)

  • वंदे भारत एक्सप्रेस (२०७०६/२०७०५) : मुंबई – जालना
  • जनशताब्दी एक्सप्रेस (१२०७१/१२०७२) : मुंबई – हिंगोली
  • सेवाग्राम एक्सप्रेस (१२१३९/१२१४०) : मुंबई – नागपूर
  • मुंबई-धुळे एक्सप्रेस (११०११/११०१२)
  • मुंबई-बल्लारशाह एक्सप्रेस (११००१/११००२)

अंशतः रद्द झालेली गाडी

  • अमरावती-मुंबई एक्सप्रेस (१२११२) : नाशिकरोडपर्यंतच धावेल.
  • परतीची गाडी (१२१११) २० ऑगस्ट रोजी मुंबईऐवजी नाशिकरोडवरूनच सुटणार आहे.

रेल्वे प्रशासनाचा सल्ला (Mumbai Railway Update)

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवासाला निघण्याचे आवाहन केले आहे. गाड्या रद्द आणि विलंबामुळे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असून संतापाचे वातावरण आहे.