नांदगाव, नाशिक: नांदगाव तालुक्याचा नदी जोड प्रकल्पात समावेश करण्याची मागणी जोर धरत असून, या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. या मागणीसाठी नार-पार जलहक्क समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत एकमुखाने ठोस भूमिका घेतली गेली.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात आली. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होते. या सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून नांदगाव तालुक्याचा नदी जोड प्रकल्पात समावेश करण्यासाठी अधिकृत दबाव आणण्याची योजना आखण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.