Nagarsool Talathi Bribe : “नगरसूल: तलाठ्याची लाचखोरी उघड, प्रशासनाच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह”

Nagarsool Talathi Bribe

येवला तालुक्यातील नगरसूल येथे एका तलाठ्याच्या लाचखोरीचा bribe पर्दाफाश करत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठा धक्का दिला आहे. बुधवारी (दि. ८) बिनदिक्कतपणे 1,000 रुपयांची लाच घेताना तलाठी बापू वामनराव पवार (वय ५४) यांना रंगेहाथ पकडण्यात आले

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतजमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी दस्तनोंदणी करण्यात आली होती. मात्र, सातबारावर मुलाचे नाव चुकीचे नोंदले गेल्याने नोंद रद्द झाली. ही नोंद पुन्हा दुरुस्त करून चढवण्यासाठी तलाठी पवार यांनी तक्रारदाराकडे 1,000 रुपयांची लाच आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी आणखी 500 रुपयांची मागणी केली होती.


तक्रारदाराने या घटनेची माहिती नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. ACB पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचला आणि तलाठी पवार यांना एका हजार रुपयांची लाच bribe घेताना रंगेहाथ पकडले.


या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी, आणि विनोद पवार यांनी ही कारवाई यशस्वी केली.