Nagpur teacher recruitment scam : नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

Nagpur teacher recruitment scam

580 अपात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता

Nagpur teacher recruitment scam – नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे 580 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींचा घोटाळा

प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाखांची रक्कम घेतली गेल्याचा आरोप

या प्रकरणात बनावट शालार्थ आयडी वापरून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बोगस भरती (Nagpur teacher recruitment scam) करून शासनाची फसवणूक करण्यात आली. प्राथमिक तपासात समोर आले की, प्रत्येक भरतीसाठी 20 ते 35 लाख रुपयांची लाच घेण्यात आली होती. यामुळे पोलिसांकडून आता भरती झालेल्या व्यक्तींच्या बँक खात्यांची चौकशीही सुरू करण्यात येणार आहे.

मृत अधिकाऱ्याच्या नावावर बोगस स्वाक्षऱ्या (Nagpur teacher recruitment scam)

सोमेश्वर नैताम यांच्या नावाचा गैरवापर

या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आणि त्यानंतर निधन पावलेल्या सोमेश्वर नैताम यांच्या नावाचा बेकायदेशीर वापर झाला आहे. 2016 ते 2024 या कालावधीत त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या शिक्षकांची नेमणूक मागील तारखांना (backdate) दाखवण्यात आली असून, यामध्ये 100 पेक्षा अधिक नियुक्त्या बोगस असल्याचा संशय आहे.

निलेश मेश्राम याच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ (Nagpur teacher recruitment scam)

शिक्षक भरतीतील मुख्य आरोपीचा संवाद ‘एबीपी माझा’च्या हाती

या घोटाळ्याचा आणखी एक धागा समोर आला आहे. मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात भरती प्रक्रियेशी संबंधित संवाद ऐकायला मिळतो. या संवादात कागदपत्रांची देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार, आणि उशीर का करतो आहात याविषयी चर्चा होताना ऐकायला येते.

ऑडिओ क्लिपमधील संभाषण:

निलेश मेश्राम: “काल तुला फोन केला होता… नागपूरला कधी येणार?… मला तुझ्याशी बोलायचं आहे. ते फाईल दाखव, फाईल… आता माझ्याकडे पैसे नाही…”

दुसरा व्यक्ती: “फाईल पाठवली नाही, मी आल्याशिवाय कशी येणार?… मला अर्जंट 10 हजार रुपये हवे आहेत…”

पोलिसांचा तपास आणि पुढील पावले

पोलिसांनी निलेश मेश्रामला ताब्यात घेतले असून, त्याच्या शाळा, संपत्ती, व नातेवाईकांच्या नावावर असलेल्या संस्था तपासल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.