महाराष्ट्र विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. मात्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या चर्चांना खोडसाळ ठरवत नाना पटोले यांनी आपला राजीनामा दिलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
काँग्रेससाठी यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत निराशाजनक ठरली. पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, आणि यशोमती ठाकूर यांसारख्या नेत्यांचा पराभव ही पक्षासाठी मोठी धक्का होती.
नाना पटोले यांचा साकोली मतदारसंघातून काठावर विजय झाला असून, त्यावरून त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पक्षाने स्पष्ट केले आहे की सध्यातरी नाना पटोलेच काँग्रेसचे नेतृत्व करणार आहेत, आणि त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न काही खोडसाळ प्रवृत्तींकडून होत आहे.