नाशिक | (Narali Purnima 2025) – श्रावण महिन्यातील दोन प्रमुख सण – नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन – यंदा सलग दोन दिवस साजरे होणार आहेत. पंचांगानुसार, जर लागोपाठच्या दोन दिवसांत पौर्णिमा असेल तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरे करण्याची प्रथा आहे. यावर्षीही असाच दुर्मिळ योग जुळून आला आहे.
नारळी पौर्णिमा – शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
रक्षाबंधन – शनिवार, 9 ऑगस्ट 2025
यंदा पौर्णिमेची सुरुवात 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 वाजता होऊन ती 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:29 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दोन दिवस पौर्णिमेचा शुभ योग आहे.
नारळी पौर्णिमेचे महत्त्व
कोकण किनाऱ्यावरील मच्छीमार बांधव समुद्राला नारळ अर्पण करून नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात करतात. श्रावण पौर्णिमेला हा सण धार्मिक व सांस्कृतिक उत्साहात साजरा होतो.
रक्षाबंधनाचा उत्साह
भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठा राख्या, मिठाई आणि भेटवस्तूंनी सजल्या आहेत. महिलावर्ग खरेदीसाठी उत्सुक असून, भावंडांच्या भेटीगाठींचा माहोल रंगला आहे.
रक्षाबंधन 2025 चे शुभमुहूर्त (Narali Purnima 2025)
शनिवारी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग्य योग असे दोन विशेष शुभ योग आहेत, जे अत्यंत मंगल मानले जातात. यामुळे यंदाचा रक्षाबंधन सण अधिक शुभ आणि आनंददायी ठरणार आहे.