नाशिक महापालिकानाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

Ganpati visarjan mirvnuk margachi pahani

दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी केली. विसर्जन मिरवणूकचा मार्ग वाकडी बारव, फाळके रोड, दूध बाजार, गाडगेमहाराज पुतळा परिसर, मेन रोड, धुमाळ पॉईंट,एमजी रोड,मेहेर सिग्नल,अशोक स्तंभ,रविवार कारंजा,मालेगांव स्टँड,पंचवटी कारंजा,मालवीय चौक, रामकुंड परिसर,गौरी पटांगण,म्हसोबा पटांगण या मार्गाची पाहणी डॉ. अशोक करंजकर यांनी या पूर्वी दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी केली होती या मार्गावर असलेले अतिक्रमण त्याचबरोबर या मार्गावरील रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त करंजकर यांनी दिले होते. मिरवणूक मार्गावर विद्युत विभागाच्या तारांचा होणारा अडथळा दूर करण्याबाबत महाराष्ट्र महावितरण विभागातील अभियंता यांना आयुक्त करंजकर यांनी सूचना केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या बाबत प्रत्यक्ष आजच्या पहाणी दौऱ्यात आढावा घेण्यात आला. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडवी कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी आज पुन्हा मिरवणूक मार्गाची पाहणी करूनविविध मंडळाच्या स्वागत कमानी काढून घेण्याबाबत मिरवणूक मार्गावरील काही ठिकाणी पोलीस विभागाच्या सूचनेनुसार अडथळा आणणाऱ्या विद्यूत तारा काढणे बाबत सूचना केल्या. मिरवणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने पहाणी दौऱ्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या पहाणी दौऱ्यात नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे,गणेश मैड, राजेंद्र शिंदे,अनिल गायकवाड,घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी चंदन घुगे ,राजाराम जाधव मदन हरिशचन्द्र उपअभियंता नितीन राजपूत,रविंद्र घोडके,नितीन धामणे, आदी अधिकारी या विसर्जन मार्ग मिरवणूक पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. रामकुंडावर गणेश मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन पर्यावरणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त गणेश मूर्ती संकलित करण्याचे आवाहन मनपाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह नाशिककर आणि विविध स्वयंसेवी संस्थांना यावेळी आयुक्त करंजकर यांनी केले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply