नाशिक रोड (प्रतिनिधी ) भुसावळ मंडलातील नाशिक स्टेशन येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या तिसऱ्या दिवशी स्वच्छता जागरूकता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे उद्दिष्ट प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे असे होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या प्रभात फेरीत स्टेशन प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, रेल्वे कर्मचारी, आणि आरपीएफ स्टाफ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रभात फेरीच्या दरम्यान, प्रवाशांना स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी विविध संदेश प्रदर्शित करून जागरूक करण्यात आले.
स्वच्छता फेरीदरम्यान, “स्वच्छता ही सेवा” आणि “स्वच्छ भारत, सुंदर भारत” यांसारखे संदेश घेऊन रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी स्टेशन परिसरात प्रदक्षिणा करत होते. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प केला.
रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमाने प्रवाशांमध्ये स्वच्छतेबद्दलची सकारात्मक भावना निर्माण केली असून, स्टेशन परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले.