नाशिक जिल्हा क्रीडा क्षेत्रात सकारात्मक कामगिरी करत असताना नाशिकरोडच्या योगेश्वरी प्रशांत जेजुरकर हिने जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले आहे.
मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन, सह आयोजक बंगाल आमेटूर स्विमिंग असोसिएशन, तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मुर्शिदाबाद इथे ७८ व्या इंटरनॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत ३६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात मुले आणि मुलींचाही सहभाग होता.
याच स्पर्धेत नाशिकमधून बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
त्यात पत्रकार प्रशांत जेजुरकर यांची कन्या योगेश्वरी आणि प्रणव चीखले यांचाही सहभाग राहिला.
प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण घेत योगेश्वरी हिने अनेक जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांनाच चकित केले आहे. याबरोबरच तिला वडील प्रशांत जेजुरकर यांनीही मेहनत घेत आपल्या मुलीला या स्पर्धेमध्ये यशस्वी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नाशिकरोडच्या जिजामाता जलतरण तलावाचे प्रशिक्षकांचेही मोठे योगदान राहिले.
हा सर्व अनुभव पणास लावत योगेश्वरीने बंगालच्या गंगा नदीत १९ किलोमिटर अंतर दोन तास वीस मिनिटामध्ये यशस्वीरीत्या पार केले. यावेळी तिच्यासह नाशिकचा प्रणव चिखले हाही होता.
या स्पर्धेचा समारोप खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युसुफ ए, नियमत शेख, कोलकात्याचे परिवहन मंत्री स्नेह आशिष चक्रवर्ती, देवबुध्द दास, माधुरी घोष, यांच्या हस्ते योगेश्वरी आणि प्रणव chikhle यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले .
जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप, विकास भडांगे, शंकर मादगुडी, हरी सोनकांबळे, अनिल जगताप, प्रभाकर रेवडे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
तसेच साधना एज्युकेशन स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे योगेश गाडेकर,kj मेहता हायस्कूल, महाविद्यालयाचे प्रविण जोशी यांचेही योगेश्वरीला मार्गदर्शन लाभले.
नाशिक जिल्हयातील खेळाडू विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळवीत असताना पत्रकार, दिशा न्युज चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर यांच्या कन्येने जलतरण क्षेत्रात जे प्रावीण्य मिळविले त्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एक् मुलगी म्हणून योगेश्वरी सुध्दा त्यास निश्चितच पात्र ठरली, यात संदेह नाही.
फक्त एक खंत आहे की खेळाडूंना राजाश्रय मिळाल्यास, मग तो कोणताही खेळाडू असो, हे खेळाडू शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करु शकतात. त्यासाठी समाजातील मान्यवरांनी पुढे येण्याची गरज आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.