संजय राऊतांचा नाशिक दौरा: आरक्षण, सावरकर, पुण्यातील बलात्कार, मोदींचा दौरा आणि शिंदे सरकारवर जोरदार टीका

Sanjay Raut Demands Immediate Encounter of Pune Gang Rape Accused

नाशिक ( प्रतिनिधी):शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडत सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरक्षण, सावरकरांवरील टीका, पुण्यातील सामूहिक बलात्काराची घटना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालेगाव दौऱ्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आरक्षणावर टीका

संजय राऊत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करणाऱ्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. जरांगे पाटील आणि अनेकजण या लढ्यात आघाडीवर आहेत, मात्र, शिंदे सरकारकडून तीन गटांमध्ये भांडण लावण्याचे काम सुरू आहे. केंद्राने तातडीने आरक्षण वाढवून दिले पाहिजे. आमच्या सरकारने आले, तर आम्ही 50 टक्क्यांच्या वरती आरक्षण देऊ.” तसेच, त्यांनी तामिळनाडूमधील आरक्षणाचे उदाहरण देत केंद्राकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली.

सावरकरांवरील टीकेबद्दल प्रतिक्रिया

सावरकरांवरील टीकांबद्दल राऊत म्हणाले, “सावरकरांनी विज्ञान दृष्टीकोन ठेवला होता. त्यांचे विचार खाण्या-पिण्यामुळे हिंदुत्व किंवा इस्लाम ठरत नाहीत. गोमातेला राज्य माता म्हणून दर्जा देण्याबाबत सावरकर सहमत नव्हते. त्यांच्या मते, गायी हे एक उपयुक्त पशू होते, तर गायी बैलांची माता होती, असे सावरकरांचे मत होते.”

पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर तीव्र संताप

राऊत यांनी पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल संताप व्यक्त करत फडणवीस आणि शिंदे सरकारला कठोर सल्ला दिला. “तिघांचे एन्काऊंटर फडणवीस आणि शिंदे यांनी करावे. बदलापूरमध्ये जसा एन्काऊंटर झाला, तसाच पुण्यातील आरोपींवरही तात्काळ कारवाई व्हावी. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कमरला असलेले पिस्तूल बाहेर काढावे आणि फोटोमधून बाहेर यावे,” असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे फक्त भाजपाचे नेते आहेत. त्यांनी तात्पुरता शिवसेनेचा लेबल लावला आहे, पण त्यांच्या नेत्यांचे नाव नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे.”

बारामती आणि मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

राऊत यांनी अजित पवारांच्या बारामतीतील स्थितीबद्दलही टिप्पणी केली. “अजित पवार यांची बारामतीतील परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यांनी भाजपाचे वस्त्र नेसून त्यांच्या घरात नांदायचे बाकी आहे.” तसेच, मुख्यमंत्र्यांच्या मालेगाव दौऱ्यावरही टीका करत राऊत म्हणाले, “आमच्याकडे असताना पालकमंत्र्यांना शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नव्हती.”

Leave a Reply