नाशिक (सिडको) Nashik Accident News : अंघोळीच्या वेळी गरम पाणी अंगावर पडल्याने केवळ दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड परिसरातील केवलपार्क येथे घडली. भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या बालकावर उपचार सुरू असतानाच त्याने प्राण सोडले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अपघातातील मृत बालकाची माहिती:
- नाव: आयुष पावरा
- वय: दीड वर्ष
- ठिकाण: केवळपार्क, अंबड लिंक रोड, सिडको – नाशिक
दुर्दैवी घटना कशी घडली?
Nashik Accident News – २३ मे रोजी, घरात अंघोळीच्या तयारीदरम्यान उकळते गरम पाणी अचानक आयुषच्या अंगावर पडले. यामुळे तो ५० ते ६० टक्क्यांपर्यंत भाजला गेला होता. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिस तपास सुरू
या घटनेनंतर अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलिस हवालदार टोपले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
खबरदारी हीच सुरक्षितता
ही घटना पालकांसाठी सतर्कतेचा इशारा आहे. घरामध्ये गरम पाणी हाताळताना विशेषतः लहान मुलांच्या उपस्थितीत सावधगिरी आवश्यक आहे, अन्यथा असे हृदयद्रावक प्रसंग घडू शकतात.