NHM Nashik Recruitment 2025: Apply Offline for 7 Vacancies
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट (IDSP), फिजिओथेरपिस्ट, EMS समन्वयक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ), ऑडिओलॉजिस्ट आणि पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) अशा ७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज प्रक्रियेची महत्त्वाची माहिती:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: २४ जानेवारी २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ फेब्रुवारी २०२५ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
- अर्ज पाठवण्याचा पत्ता:
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आवार, नाशिक
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता:
वयोमर्यादा:
- खुल्या प्रवर्गासाठी: १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी: १८ ते ४३ वर्षे
- वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ उमेदवारांसाठी: कमाल ७० वर्षे
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
महत्त्वाचे:
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी. ऑफलाइन अर्ज वरील पत्त्यावर नियोजित वेळेत पाठवणे आवश्यक आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये!