Construction Safety : नाशिक: चौदाव्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव उघड

ConstructionSafety

Construction Safety : नाशिकच्या गोविंद नगर परिसरातील एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकाम साईटवर झालेल्या भीषण अपघातात एका 20 वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा (Construction Safety) उपायांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अपघाताची सविस्तर माहिती (Construction Safety)

गोविंद नगरमधील आरडी सर्कल परिसरात सध्या एका गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सकाळी साधारण साडे आठच्या सुमारास विश्वजीत विश्वास (वय 20, मूळ रहिवासी: नावतरा, जि. नदीया, पश्चिम बंगाल) हा कामगार चौदाव्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम करत होता. कामादरम्यान लोखंडी प्लेट सटकून थेट त्याच्या अंगावर पडली, त्यामुळे तो लोखंडी प्लेटसह खाली कोसळला. हा अपघात इतका गंभीर होता की विश्वजीत विश्वासचा जागीच मृत्यू झाला.

बांधकाम स्थळी सुरक्षेचा अभाव?

या दुर्घटनेनंतर बांधकाम साईटवरील सुरक्षेच्या उपायांची कमतरता समोर आली आहे. स्थानिक कामगारांच्या मते, सुरक्षेसाठी कोणतीही पथके किंवा उपकरणे उपलब्ध नव्हती. कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गार्ड रेल्स यांसारखी मूलभूत सुरक्षेची साधनेही पुरवली जात नाहीत.

बांधकाम क्षेत्रातील अपघात वाढले

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सध्या अनेक मोठ्या इमारतींची उभारणी सुरू आहे. मात्र, मजुरांच्या सुरक्षेकडे बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. माहितीनुसार, गेल्या वर्षभरात 100 हून अधिक बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

पोलिस तपास आणि प्रशासनाची भूमिका

या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कामगार उपायुक्त आणि पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामगार सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना आवश्यक

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरक्षिततेच्या कडक नियमांची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित ठेकेदार आणि बांधकाम कंपन्यांनी सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.