नाशिकमध्ये पुन्हा कोरोना सक्रिय! आठवड्यात ५ नवे रुग्ण, महापालिका सतर्क
नाशिक Nashik Corona Alert |
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा डोके वर काढू लागला असून, गेल्या आठवड्यात ५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी खासदार हेमंत गोडसे यांना याआधी कोरोनाची लागण (Nashik Corona Alert) झाल्याने चिंता वाढली होती. आता एकूण रुग्णसंख्या पाचवर पोहोचली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महत्त्वाचे म्हणजे या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून, त्यातील दोन जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. उर्वरित तीघांवर शहरातील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून, जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात रुग्णसंख्या वाढतेय! (Nashik Corona Alert)
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांत कोरोनाचे नवे रुग्ण सातत्याने समोर येत आहेत. त्याच पावलावर नाशिकमध्येही कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
स्वतंत्र कोरोना कक्षांची निर्मिती
झाकीर हुसेन व ठाकरे रुग्णालयात स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच, खासगी लॅब आणि रुग्णालयांना रुग्णांची माहिती महापालिकेला तात्काळ कळवण्याचे आदेश दिले गेले आहेत.
आरोग्य विभागाची कारवाई
महापालिकेने आयएमए, निमा आणि जनरल प्रॅक्टिशनर्स संघटनांना पत्र पाठवून, संशयित व बाधित रुग्णांची माहिती दररोज देणे बंधनकारक केले आहे.
या भागांमध्ये कोरोना तपासणी व उपाययोजना अधिक गतिमान करण्यात आल्या आहेत.
“घाबरू नका, पण काळजी घ्या!” – डॉ. तानाजी चव्हाण
“पाचही रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत. नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, गर्दी टाळणे, हात धुणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे.”
— डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नाशिक महानगरपालिका
महत्वाचे निर्देश – नागरिकांसाठी सूचना
- सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करा
- ताप, सर्दी, खोकला असे लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्या
- गर्दीपासून दूर राहा, स्वच्छता पाळा
- अफवांवर विश्वास ठेवू नका; अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा
#NashikCoronaUpdate #COVID19Nashik #NashikNews #CoronaAlert #NashikHealthDepartment #NashikMunicipalCorporation #HemantGodseCorona #NashikLocalNews #BreakingNews