Nashik Crime | 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या सावकाराला अटक, जीवघेणी धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

Nashik Crime | Moneylender arrested for demanding ransom of Rs 5 lakhs, case registered for life-threatening threats

व्हाइट कॉलर सावकाराचा खुलासा | तक्रारदाराच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत पैशांची मागणी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक Nashik Crime: नाशिक शहरात सावकारांकडून सुरू असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्हाइट कॉलर सावकाराने पाच लाख रुपयांची खंडणी मागत तक्रारदाराच्या आई-वडिलांसह मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तुषार कैलास सानप (रा. जेहान सर्कल, ऋषिराज बिल्डिंग) याला अटक करण्यात आली आहे.

प्रकरणाचा तपशील:

तक्रारदार: शुभम घुगे (रा. कमलनगर, सिन्नर)
संशयित: तुषार कैलास सानप (White Collar Moneylender)
ठिकाण: गंगापूर रोड, नाशिक
गुन्ह्याचा प्रकार: खंडणी, धमकी, मारहाण

2023 साली ओळख झाल्यानंतर तुषार सानपने फ्लॅट बुकिंगसाठी शुभम घुगेकडून नेट बँकिंगद्वारे 5 लाख रुपये उसनवार घेतले होते. नऊ महिन्यांनीही पैसे परत न दिल्याने तक्रारदाराने तगादा लावल्यानंतर त्याने केवळ 4 लाख रुपये परत केले, पण उर्वरित रक्कम मागितल्यावर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली.

धमक्यांचा धडका:

  • तू जर पैसे मागितले तर तुझ्या मुलाला संपवून टाकेन” – आई-वडिलांना धमकी
  • माझं लग्न मोडलं तुझ्यामुळे, आता भरपाई म्हणून 5 लाख दे नाहीतर गेम करतो
  • शुभम घुगे यांना दोन साथीदारांच्या मदतीने मारहाण

भीतीपोटी तक्रारदाराने आधीच ₹50,000 दिले, तरीही सानपचा खंडणीसाठी तगादा सुरूच होता.

पोलिस कारवाई आणि राजकीय संबंध

  • तुषार सानप हा एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा निकटवर्तीय असल्याची माहिती
  • पोलिस अधिकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
  • त्यामुळे याआधी कोणीही त्याच्याविरोधात तक्रार दाखल करू शकले नव्हते

गंगापूर पोलिसांनी तत्काळ अ‍ॅक्शन घेत सानपला अटक केली असून, न्यायालयीन कारवाई सुरू आहे.