MD Drugs विक्री प्रकरण | Drug Racket चे जाळे उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
नाशिक (Nashik Crime): शहरातील एमडी ड्रग्ज (MD Drugs) विक्री प्रकरणावर पोलिसांकडून सातत्याने कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, या ड्रग रॅकेटची (Drug Racket) पाळेमुळे उखडून टाकण्याचे मोठे आव्हान अद्यापही पोलिसांसमोर कायम आहे. अलीकडेच, इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) केलेल्या कारवाईत आणखी एका एमडी ड्रग्ज विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.
इंदिरानगर पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत एमडी ड्रग विक्रेत्याबाबत माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकत खालीद कय्युम शाह (वय २९, रा. बिल्डिंग ए-१०, रूम नं. ५१, म्हाडा वसाहत, वडाळागाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार ५०० रुपये किमतीचा ५.५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ (Methylenedioxymethamphetamine) जप्त करण्यात आला.
अंमली पदार्थ विक्रीचा बेकायदेशीर उद्योग (Nashik Crime)
पोलिस तपासात उघड झाले की, आर्थिक फायद्यासाठी खालीदने हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जवळ ठेवला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर करत आहेत.