फ्रॉड न्यूज : मुंबईतील महिलेकडून उत्तराखंडातील गेस्ट हाऊस विक्रीचा बनावट व्यवहार
ठळक मुद्दे : Nashik Crime Update
- नाशिकमध्ये हायप्रोफाईल फसवणूक उघडकीस
- मुंबईतील महिलेकडून नामांकित व्यावसायिकाला 1 कोटी 1 लाख रुपयांचा गंडा
- भारत सरकारचा बनावट ई-स्टॅम्प पेपर वापरून मोठा व्यवहार
इंदिरानगर (नाशिक) : नाशिकमध्ये एका नामांकित व्यावसायिकाला तब्बल 1 कोटी 1 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील अरुणा श्रीकृष्ण मोरे हिने उत्तराखंडातील गेस्ट हाऊस स्वतःच्या मालकीचे असल्याचे भासवून हा बनावट व्यवहार केल्याचे समोर आले आहे. यासाठी तिने भारत सरकारचा हुबेहूब बनावट ई-स्टॅम्प पेपर वापरला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेचा तपशील :
फिर्यादी धीरज भवरलाल काबरा (वय 52, रा. श्रीजी सिनर्जी अपार्टमेंट, गोविंदनगर) हे प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. त्यांची ओळख मुंबईतील भांडुपमधील अरुणा मोरे या महिलेशी झाली. तिने उत्तराखंड राज्यातील रूडकी गावातील “साबरी रजवी गेस्ट हाऊस” ही प्रॉपर्टी आपलीच असल्याचे सांगून ती विक्रीसाठी असल्याचा प्रस्ताव दिला.
या प्रॉपर्टीचा व्यवहार ₹4 कोटी 65 लाख इतक्या रकमेवर ठरवण्यात आला. आरोपीने खोट्या कागदपत्रांवर विश्वास बसवून काबरा यांच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांत ₹1 कोटी 1 लाख रुपये रोख स्वरूपात उकळले. व्यवहाराची प्रक्रिया हॉटेल तपस्वी (इंदिरानगर) येथे झाली. मात्र, प्रत्यक्ष चौकशी केली असता गेस्ट हाऊस तिच्या मालकीचे नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस कारवाई : (Nashik Crime Update)
फसवणूक लक्षात येताच धीरज काबरा यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अरुणा श्रीकृष्ण मोरे हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.