Nashik Crime News | Accident Update | Highway Incident | नाशिक क्राईम अपडेट
नाशिक : महामार्गावरील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातानंतर भरधाव आयशर ट्रक चालकाने कारचालकास शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव (ब.) ता. निफाड येथील ऋतिक संदिप शिंदे यांनी या घटनेबाबत फिर्याद दाखल केली आहे. शिंदे शनिवारी (दि. १६) आपल्या आईसोबत नाशिक शहरात आले होते. रात्री सुमारे १० वाजता एमएच १५ एचक्यू ३९८७ या अल्टो कारने परतत असताना बळी मंदिर परिसरातील रॅम्पजवळ उड्डाणपुलावर हा अपघात झाला. एमपी ०९ एचपी ७६२५ या क्रमांकाचा भरधाव आयशर ट्रक कारच्या ड्रायव्हर साइडला धडकला.
धडकेनंतर कारचे मोठे नुकसान झाले. यावेळी शिंदे यांनी ट्रकचालकाला अपघाताचा जाब विचारला असता, संतप्त चालकाने शिवीगाळ करीत अंगावर धावून येत “तुला चाकूने मारून टाकतो” अशी धमकी दिली. या घटनेचा तपास हवालदार निंबाळकर करत आहेत.