Nashik Electricity Shutdown Alert | नाशिक स्मार्ट सिटी कामामुळे नियोजित वीजपुरवठा खंडित
नाशिक : Nashik Electricity Shutdown Alert
महावितरणच्या नाशिक शहर विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या द्वारका उपविभागातील इंदिरानगर कक्षामध्ये ८ जुलै ते १० जुलै २०२५ दरम्यान नियोजित विद्युत देखभाल व भूमिगत वाहिनीचे काम करण्यात येणार आहे.
याच अनुषंगाने ११ केव्ही भारत नगर, कल्पतरू नगर व डीजीपी नगर विद्युत वाहिन्यांखालील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
वीजपुरवठा बंद राहण्याचा कालावधी:
- ८ ते १० जुलै २०२५ रोजी दररोज
सकाळी १० वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत - शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी
सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणारे काम:
- ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार
- रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब व ट्रान्सफॉर्मर्सचे स्थलांतर
वीजपुरवठा खंडित राहणारे प्रमुख भाग (विभागवार): ( Nashik Electricity Shutdown Alert)
११ केव्ही भारत नगर वाहिनी अंतर्गत:
- खोडे नगर
- विठ्ठल मंदिर
- वडाळा गाव
- गणेश नगर
- रहमत नगर
- रविशंकर मार्ग
११ केव्ही कल्पतरू नगर वाहिनी अंतर्गत:
- अशोका मार्ग
- गोदावरी नगर
- कुरुडकर नगर
- बनकर मळा
- मातोश्री कॉलनी
- निसर्ग कॉलनी
- पखाल रोड
- गोरे हॉस्पिटल
- विधाते नगर
- विठ्ठल मंदिर
- पं. रविशंकर मार्ग
११ केव्ही डीजीपी नगर वाहिनी अंतर्गत:
- साई संतोषी नगर
- एस. एन. पार्क
- साठे नगर
- मदिना नगर
- सादिक नगर
- गुलशन नगर
- मुमताज नगर
- म्हाडा कॉलनी
- वडाळा गाव
- मेहबूब नगर
महत्त्वाचे आवाहन:
महावितरणने ग्राहकांना विनंती केली आहे की, नियोजित वीजपुरवठा बंद योजनेची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.
काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास, वीजपुरवठा तत्काळ सुरू केला जाईल.