जखमींच्या नातेवाईकांमध्येच हाणामारी; रुग्णालयातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik hospital fight : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) पुन्हा एकदा गोंधळाची घटना समोर आली आहे. अपघात विभागात दोन गट आमने-सामने आले आणि यावेळी जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये उपचारासाठी आलेल्या जखमी व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला.
मुंबई नाका परिसरातील वाद रुग्णालयात पोहोचला (Nashik hospital fight)
सदर हाणामारी ही नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून उगम पावली होती. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र तिथेच पुन्हा वाद भडकला आणि रुग्णालयातच गोंधळ उडाला. मुंबई नाका पोलिसांनी घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
शॉर्ट सर्किटमुळे नवजात शिशू कक्षात लागली आग
66 नवजात बालकांना सुरक्षितपणे दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले(Nashik hospital fight)
कालच नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत सर्व 66 नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं.
सुदैवाने जीवितहानी टळली
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच परिचरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत सर्व बाळांना शेजारच्या कक्षात हलवलं. काही वेळ गोंधळ उडाल्यानं मातांची धावपळ झाली, मात्र सर्व बाळं सुखरूप असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी दिली.
रुग्णालय प्रशासनावर पुन्हा सवाल
सुरक्षेच्या मुद्द्यावर चौकशीची गरज
या दोन घटनांमुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालय हे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षित हवं, मात्र सततच्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.