Nashik : कोटा आयआयटीच्या नावे नाशिकमध्ये 10 लाखांची फसवणूक; संचालक पसार

कोटा आयआयटीच्या नावे नाशिकमध्ये 10 लाखांची फसवणूक; संचालक पसार

Nashik : राजस्थानमधील कोटा आयआयटीच्या नावे नाशिकच्या कॉलेज रोडवरील कोचिंग क्लासद्वारे फाऊंडेशन कोर्स आणि फीच्या नावाखाली तब्बल 10 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित संचालकांवर फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

घटना कशी उघडकीस आली:
गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावाने “कौन बनेगा रामानुजन” ही स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात आले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून कोचिंग क्लासमध्ये अॅडमिशनसाठी आमिष दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, ट्यूशन फीमध्ये सूट, आणि इतर सुविधा देण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळण्यात आले. मात्र, क्लास 12 जुलै 2024 रोजी अचानक बंद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

संशयित संचालकांची नावे:

  1. जयसिंग मानसिंग भोजावत उर्फ चौहान
  2. मानसिंग छोंगसिंग भोजावत उर्फ चौहान
  3. नवरतन मानसिंग भोजावत
  4. दीपासिंग भोजावत
  5. सुरेंद्रसिंग मानसिंग भोजावत
  6. उमा खुशबू सुरेंद्र भोजावत

फसवणुकीचा प्रकार:

विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्सची फी 1.6 लाख रुपये सांगण्यात आली होती.

स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपद्वारे फीमध्ये 70% सूट देण्याचे सांगितले.

पालकांनी विश्वास ठेवल्याने सुमारे 48 हजार रुपये प्रति विद्यार्थी भरले.

ट्यूशन, युनिफॉर्म, व्हॅन आणि इतर सुविधांच्या नावाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पैसे घेतले गेले.

झोल उघड:
क्लास सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच स्कूल व्हॅन बंद पडली, आणि पालकांनी चौकशी केल्यावर संचालक गायब असल्याचे समजले. पोलिस तपास सुरू असून उपनिरीक्षक मोतीलाल पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.