Nashik KumbhMela 2027 : नाशिक कुंभमेळा 2027 संकटात? तातडीने ₹118 कोटी निधी द्या – बंटी तिदमे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी”

Nashik KumbhMela 2027

लाखो भाविकांच्या सोयीसाठी प्रकल्प पूर्ण होणे अत्यावश्यक; राज्य व केंद्र शासनाकडे तातडीचा निधी देण्याची विनंती

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik KumbhMela 2027 : पायाभूत सुविधांसाठी तातडीने निधी द्या – प्रवीण (बंटी) तिदमे यांची मागणी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी २०२७ सिंहस्थ कुंभमेळा (Nashik KumbhMela 2027) पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे.


118 कोटींच्या पूल आणि रस्ते प्रकल्पांना निधीची प्रतीक्षा

6 पूल प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध; निधी अभावी कामांवर परिणाम होण्याची शक्यता

  • नाशिक महानगरपालिकेने सिंहस्थ 2027 (Nashik KumbhMela 2027) च्या पार्श्वभूमीवर नवीन पूल बांधकाम, रस्ते रुंदीकरण व इतर नागरी सुविधांसाठी प्रस्तावित प्रकल्प हाती घेतले आहेत.
  • सध्या, 118 कोटी रुपये खर्चाच्या सहा पूल प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध झाल्या असून, निविदा अटींमध्ये स्पष्ट नमूद आहे की कामाची देयके निधीच्या उपलब्धतेनुसार दिली जातील.
  • नाशिक महापालिकेच्या आर्थिक क्षमतेपेक्षा हे प्रकल्प मोठे असल्याने शासनाकडून तातडीचा निधी आवश्यक आहे, असे प्रवीण तिदमे यांनी सांगितले.

कुंभमेळ्याला वेळेत मंजुरी आणि निधी मिळालाच पाहिजे” – तिदमे

शासनाने औपचारिक मंजुरी न दिल्याने प्रकल्प अडचणीत

  • सिंहस्थ कुंभमेळा हा देशभरातील लाखो भाविकांना आकर्षित करणारा धार्मिक सोहळा आहे.
  • परंतु अद्याप राज्य शासनाकडून औपचारिक मंजुरी मिळालेली नाही आणि निधीबाबत अनिश्चितता असल्याने कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • तिदमे यांनी राज्य शासनासह केंद्र सरकारकडेही निधीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.