Nashik Loan Fraud: मोबाइलवर कर्ज मंजुरीचं आमिष देत 25 जणांची लाखोंची फसवणूक; मुख्य आरोपी अटकेत

Nashik Loan Fraud: 25 people cheated of lakhs by promising loan approval on mobile; Main accused arrested

नाशिक | Nashik Loan Fraud
मोबाइलवर कर्ज मंजुरीचं आमिष दाखवून तब्बल २५ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक फसवणूक करून मौजमजा करणारा सुमीत संजय देवरे (३०, रा. सद्गुरुनगर, नाशिक) याच्यावर नाशिकसह विविध ठिकाणी पाच गुन्हे दाखल आहेत.

मोबाईलवरून ‘लोन मंजूर’चा बहाणा:
देवरे याने आपल्या मित्र प्रतिक सोनटक्के व संतोष कांबळे यांच्या मदतीने गंगापूर व म्हसरूळ पोलीस ठाण्यांत नोंदवलेले दोन गुन्हे केले. मोबाइलवर कमी रकमेचे इन्स्टंट लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची वैयक्तिक माहिती व कागदपत्रे घेत, त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेतले. मात्र, संपूर्ण रक्कम संबंधितांना न देता, त्यांना केवळ १०-१२ हजार रुपये देत उर्वरित पैसे स्वतःच्या खात्यात वळवले.

खंडणीविरोधी पथकाने रचला सापळा:
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, देवरे हा इगतपुरीहून बळी मंदिराजवळ येणार असल्याचे समजल्यावर सापळा रचण्यात आला. रात्री ९ वाजता देवरे बळी मंदिराजवळ दिसताच त्याला अटक करण्यात आली. त्याचा ताबा गंगापूर पोलिसांकडे सोपवण्यात आला असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मुंबईत मौजमजा, लक्झरी फोन खरेदी:
देवरे याने फसवणुकीतून मिळवलेल्या रकमेचा वापर मुंबईतील लक्झरी जीवनशैलीसाठी केला. तो इतरांच्या नावावर लोन घेऊन २० पेक्षा अधिक iPhone आणि Vivo मोबाईल खरेदी करायचा. हे फोन काही दिवसांतच विकून त्यातून आलेल्या पैशांतून मद्यपान, महागड्या वस्तू खरेदी करत होता.

कर्जग्रस्तांना बँकांचा पाठपुरावा: Nashik Loan Fraud
देवरेने जिनांच्या नावाने कर्ज घेतले, ते आता हप्त्यांसाठी बँकांकडून पाठपुरावा झेलत आहेत. अनेकजण अनभिज्ञ असताना त्यांच्या नावावर कर्ज घेतल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पोलीस तपासात देवरे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे.