Nashik: महिलेच्या कारमधून ८ ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास

Dagine chor

Nashik : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारमधून ८ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सुमेधा वराडे (रा. नगर पुणावळे, पिंपरी चिंचवड) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सुमेधा वराडे या लग्नासाठी नाशिकमध्ये आल्या होत्या आणि त्या एका स्थानिक हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यांनी कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली असता, अज्ञात व्यक्तीने त्यातील मंगळसूत्र चोरले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई नाका पोलिस करत आहेत.