वर्षभर चाललेल्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश | गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक
Nashik MLM scam | एका वर्षापासून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मल्टी लेव्हल मार्केटिंग (MLM) टोळीचा पर्दाफाश झाला असून, याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील चार संशयित नाशिकचेच असल्याचे उघड झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलीस म्हणतात… गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू होती फसवणूक (Nashik MLM scam)
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी सुरुवातीला गुंतवणूकदारांना आकर्षक आर्थिक परतावा देऊन विश्वास संपादन केला. मात्र, काही महिन्यांनंतर परतावा थांबवण्यात आला आणि नागरिकांची फसवणूक सुरू झाली.
सिडको परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी फसवणुकीबाबत पोलिसांकडे तक्रार केली असून, त्यांच्या जबाबांची नोंद घेण्यात आली आहे.
MLM म्हणजे नेमकं काय?
पिरॅमिडच्या माध्यमातून फसवणूक कशी केली जाते?
MLM – मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेत गुंतवणूकदारांची साखळी तयार केली जाते.
एक व्यक्ती गुंतवणूक करताना स्वतःच्या ओळखीतील ३-४ जणांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतो. नंतर हेच लोक त्यांच्या ओळखीतील इतरांना गुंतवणुकीस उद्युक्त करतात. अशा रीतीने पिरॅमिड तयार होते आणि लाखो रुपये जमा केले जातात.
मुख्य सूत्रधारांचा शोध अडचणीत
या प्रकारातील सर्वात मोठी अडचण म्हणजे, योजनेचा मूळ सूत्रधार समोर येत नाही. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर लोकांना पैसे मागण्यासाठी कुणाकडे जायचं हेच कळत नाही.
याचा परिणाम म्हणून नातलगांमध्ये आणि मित्रांमध्ये आर्थिक वाद निर्माण होतात, काही वेळा तर सामाजिक संबंधही तुटतात.
सायबर पोलिसांकडून तपास सुरु | नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
नाशिक सायबर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयितांची पार्श्वभूमी आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. नागरिकांना अशा आकर्षक गुंतवणूक योजनेपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.