Nashik Murders Update | सातपूरमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

mbcMarathi

Nashik Crime News | सातपूरमध्ये कौटुंबिक वादातून भाऊच भाऊचा घातक ठरला

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक (सातपूर) Nashik Murders Update: नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगरमध्ये बुधवारी (११ जून) दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. सततच्या घरगुती वादातून मोठ्या भावाने आपल्या सख्या लहान भावाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची गंभीर घटना घडली. करण शिंगाडे (वय ३०) असे मृताचे नाव असून, अर्जुन शिंगाडे हा त्याचा मोठा भाऊ आणि खून प्रकरणातील मुख्य संशयित आहे.

Nashik Murder Case Update | काही तासांत पोलिसांनी घेतली आरोपीला अटक

शिंगाडे कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. बुधवारी दुपारी पुन्हा एकदा वाद उफाळून आला आणि तो इतका टोकाचा गेला की मोठ्या भावाने रागाच्या भरात लहान भावावर धारदार हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेल्या करणला शेजाऱ्यांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.

Nashik Satpur Crime Scene | पोलिसांनी तातडीने घेतली कारवाई Nashik Murders Update

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे (सातपूर पोलिस ठाणे), गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुरावे गोळा करत फक्त काही तासांतच अर्जुन शिंगाडेला अटक केली.

Nashik Crime Branch Action | तपास पथकाची तत्परता

तपासासाठी उपनिरीक्षक न्याहालदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलिस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ आदी अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक तयार करून संशयित अर्जुनला बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सातपूर परिसरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे.