Nashik News : तेल, डाळींच्या भावात काहीअंशी तेजी

Nashik News : तेल, डाळींच्या भावात काहीअंशी तेजी

डाळी साळींच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक- जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा ठरला. ग्राहकाच्या अभावामुळे या सप्ताहात तेलाच्या भावात दोन ते तीन रुपये लिटर मागे मंदी आली होती, मात्र सणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात तेजीचे वातावरण निर्माण झाले. डाळी साळींच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

गत दोन ते तीन सप्ताहापासून बाजारपेठेत शांततेचे वातावरण होते. मात्र नव वर्षाच्या पहिल्या सणाच्या प्रारंभाला बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण दिसून आले. नवीन गव्हाच्या आगमनाने तसेच जे वर्षभर डाळी साळींची साठवणूक करतात त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन डाळींच्या बाजारभावात तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल मागे तेजी असून भविष्यात अजून शे दोनशे ची तेजी नाकारता येत नाही.

गेल्या सप्ताहात ग्राहकाच्या अभावामुळे दोन ते तीन दिवस तेलाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी बाजार कमी झाले होते मात्र पाडव्याचा सण व येणारी चालू तारीख यामुळे बाजार पूर्वपदावर आले आहेत. गहू, डाळी, तांदूळ वर्षभरासाठी जे भरून ठेवतात, त्यांच्यासाठी ही योग्य वेळ असून भविष्यात यांच्या दरात सातत्याने वाढ ही अटळ आहे.

सणाचा प्रारंभ झाल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण असून ग्राहक या दिवसात चांगली राहील व तेलात, डाळी साळींच्या भावात काहीसे तेजीचे वातावरण आहे.

  • रितेश बूब, घाऊक व्यापारी