नाशिक : नाशिक बातमी
शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज तुफान गोंधळ उडाला. नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झालेल्या या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेत असतानाच दोन गट भिडले. आरोप असा की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी बैठकीत शिरला आणि त्यावरून वाद पेटला.
या वादात काही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कॉलर पकडून शिवीगाळ केली, ज्यामुळे पोलिस आणि सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. हा प्रकार घडल्यानंतर पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बैठकीस मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. वादातील मुख्य व्यक्ती म्हणून अहिल्यानगर शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांची नावे समोर येत आहेत.
ठळक मुद्दे: ( नाशिक बातमी)
- अहिल्यानगर जिल्ह्याच्या आढाव्यादरम्यान दोन गट आमनेसामने
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बैठकीत प्रवेश केल्याचा आरोप
- उद्योगमंत्री उदय सामंतांचा इशारा – “पक्षशिस्त मोडणाऱ्यांची गय नाही”
मंत्री सामंतांचा इशारा: (नाशिक बातमी)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, “ज्यांच्या समर्थकांनी हा प्रकार केला, त्यांची गय केली जाणार नाही. या घटनेचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. किरकोळ गैरसमजातून ही घटना घडली असली तरी पक्षशिस्त सर्वांसाठी समान आहे.”
आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया:
“बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. आतमध्ये वाद झालेला नाही, बाहेर काय घडले ते मला माहिती नाही. याबाबत मुख्य नेते निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली.