मनसेच्या उमेदवारांच्या यादीनं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे. नाशिकमध्ये मध्य मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे माजी नगरसेविका सुजाता डेरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यात काँग्रेसची डॉ. हेमलता पाटील यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे, नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने भाजपचे माजी नेते गणेश गिते यांना उमेदवारी दिली आहे. हे उमेदवार त्यांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांच्या विरोधात लढणार आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भाजपच्या आ. देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रथम यादीत त्यांचे नाव नसल्याने काहींना धक्का बसला होता. मात्र, आता पक्षाने त्यांच्या कार्याचा विचार करून त्यांना दुसऱ्या यादीत स्थान दिले आहे. फरांदे यांनी गेल्या दोन कार्यकाळात आपल्या मतदारसंघात विविध समाज घटकांना समाविष्ट करून विकासप्रकल्प उभारले आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीला विलंब झाल्यामुळे निर्माण झालेल्या गैरसमजांना विराम मिळाल्याचे सांगितले.
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेलेले गणेश गिते आता निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी आपल्या निवडणुकीसाठी शेतकरी व श्रमिकांचा विकास हाच मुख्य अजेंडा ठेवला असून, विकासाचे नवे आदर्श उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.