Nashik सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम; २ लाख लोकसंख्येवर लक्ष केंद्रीत

नाशिकमध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम; २ लाख लोकसंख्येवर लक्ष केंद्रीत

नाशिकः Nashik महानगरपालिका आरोग्य विभागाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २३ डिसेंबर २०२४ पासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे नेतृत्व आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, अध्यक्ष डॉ. तानाजी चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. शिल्पा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मोहीम कशी राबविली जात आहे?

आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. त्यांना कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्यासाठी आणि संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने गोळा करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात आले आहे. १०२ प्रशिक्षित पथके दररोज ४० ते ५० घरांना भेट देत आहेत. या मोहिमेद्वारे २ लाख लोकसंख्येमध्ये गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. संशयित रुग्णांचे थुंकी नमुने, एक्स-रे तपासणी, सिबिनेट तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या केल्या जात आहेत. नवीन आढळलेल्या क्षयरुग्णांचा औषधोपचार महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांमध्ये मोफत केला जातो.

NASHIK nmc
NASHIK nmc

अतिजोखिमग्रस्त क्षेत्रांवर विशेष लक्ष

मोहीम झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमाती, स्थलांतरित कामगार, बेघर, मध्यवर्ती कारागृह, वृद्धाश्रम इत्यादी अतिजोखिमग्रस्त क्षेत्रांमध्ये राबविली जात आहे. विविध ठिकाणी क्षयरुग्ण तपासणी शिबिरांचे आयोजन करून हँडल एक्स-रे मशीनद्वारे छातीचे एक्स-रे काढले जात आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik नागरिकांना सहकार्याचे आवाहन

आपल्या घरी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, आशा कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांनी केले आहे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला,सायंकाळी येणारा हलकासा ताप,भूक मंदावणे, वजनात लक्षणीय घट,थुंकीवाटे रक्त पडणे, चालताना धाप लागणे,मानेवरील न दुखणाऱ्या गाठी

धोकादायक गट,मधुमेह रुग्णपूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले रुग्ण एचआयव्ही संसर्गित रुग्ण,व्यसनाधीन आणि वयस्कर व्यक्ती

वरीलपैकी कोणतेही एक लक्षण असल्यास, नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण आणि नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.