Nashik : नाशिककरांनी सावध राहावे; उद्या काही भागांत पाणीपुरवठा ठप्प

Nashik a water dripping from a faucet

Nashik : 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 दरम्यान मुकणे धरण पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित राहणार, ज्यामुळे नवीन नाशिक व नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. महानगरपालिकेचे नागरिक पाण्याचा काटकसरीने वापर करतील, याची विनंती.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik : : मनपा मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशनला महावितरणच्या रेमंड सबस्टेशन गोंदे येथून 33 के.व्ही. एक्सप्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. शनिवारी, 28 डिसेंबर 2024 रोजी महावितरण कंपनीमार्फत रेमंड सबस्टेशन येथे विविध देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कारणास्तव, शनिवारी सकाळी 9.00 ते दुपारी 5.00 या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

यामुळे मुकणे धरण पंपिंग स्टेशनहून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा कच्च्या पाण्याचा पुरवठा बंद राहील. परिणामी, खालील भागांतील पाणीपुरवठा या कालावधीत विस्कळीत होईल.

Nashik : पाणीपुरवठा बंद राहणारे भाग:
नवीन नाशिक Nashik विभाग:

  • प्रभाग क्रमांक 22 (भागशः), प्र. क्र. 24 (भागशः), प्र. क्र. 25 (भागशः), प्र. क्र. 26 (भागशः), प्र. क्र. 27 (भागशः), प्र. क्र. 28 (भागशः), प्र. क्र. 29 (भागशः), प्र. क्र. 31 (भागशः)
  • नाशिक रोड विभागातील वडनेर गेट, पंपिंग स्टेशन परिसर, व रेंज रोड परिसर

Nashik : नाशिक पूर्व विभाग:

  • प्रभाग क्रमांक 14 (भागशः), प्र. क्र. 23 (भागशः), प्र. क्र. 30 (भागशः)

महानगरपालिकेच्या नागरीकांनी याची नोंद घ्यावी व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

He Pan Wacha : Nashik यलो अलर्ट: विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा सल्ला!