Nashik येणाऱ्या काही दिवसात नाताळ सण व 31 डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य साठा बाबत कारवाईच्या सूचना दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पथकाने हॉटेल संतोष कॅफे समोरील सर्कलवर पाथर्डी गाव रोड पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी येऊन सापळा रचला असता संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची एम एच 14 ई 61 11 हे संशयित मालवाहू चार चाकी वाहन येताना दिसताच त्यास थांबवून त्याची पाहणी केली असता सदर वाहनांमध्ये भुसा भरलेल्या गोण्यांमध्ये मागे लपवलेला गोवा राज्यात निर्मित तसेच केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेला अवैधमध्यसाठा क्लासिक व्हिस्की, गोल्ड अँड ब्लॅक, रियल्स वोडका, आणि वाहन असा एकूण 23 लाख 37 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहनाचा चालक अजमत शेरखान पठाण येरमाळा बस स्टॅन्ड मागे येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यास अटक करून तपासात पुढे निष्पन्न होणारे अज्ञात पुरवठादार खरेदीदार व इतर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik : पाथर्डी फाट्यावर अवैध मद्यसाठ्याची 23 लाखांची पकड; एक अटक
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ब विभाग आर जे पाटील तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धीरज जाधव गणपत अहिराव प्रवीण वाघ सदोनी विष्णू सानप जवान सर्वश्री अमित गांगुर्डे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ब विभागाचे निरीक्षक आर जे पाटील हे करीत आहेत.
He Pan Wacha : nashik-police-seize-illegal-liquor-gutkha-stock