Nashik : चोरीचा छडा २४ तासांत; तीन मंगळसूत्रांसह दोन आरोपी गजाआड

नाशिकरोड पोलीसांनी जप्त केलेले मंगळसूत्र आणि आरोपींची माहिती

“नाशिकरोड पोलीसांनी अवघ्या २४ तासांत २.१० लाख रुपयांचे तीन मंगळसूत्र जप्त करत २ आरोपींना अटक केली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik : नाशिकरोड (प्रतिनिधी )नाशिकरोडच्या उपनगर पोलीसांनी अवघ्या २४ तासांत चोरीस गेलेल्या तीन मंगळसूत्रांचा तपास लावून २,१०,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तातडीच्या तपासाद्वारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

WhatsApp Image 2024 12 30 at 4.44.39 PM 1

मंगलमूर्ती नगर, बोधलेनगर येथील प्रतिमा खैरनार (६५) यांनी घरातील कपाटातून २७ ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक सक्रिय झाले.

गुन्ह्याचा तपास करताना घरकामासाठी येणारी महिला अंजली रविद्र निकम (१९) संशयाच्या भोवऱ्यात सापडली. तिची चौकशी केली असता, तिने आपल्या मित्र राहुल गणेश जाधव (२१) याच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली दिली. दोघांना अटक करून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले:

Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, प्रभाकर सोनवणे, विनोद लखन आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावली.

चोरीस गेलेल्या मंगळसूत्रांसह मिळालेल्या मुद्देमालामुळे फिर्यादी खैरनार यांनी पोलीसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्यांचे आभार मानले.