Nashik Police Transfer News | अंबड पोलिस ठाण्यात ‘संगीत खुर्ची’चा खेळ! अडीच वर्षांत 8 वरिष्ठ निरीक्षक बदली, दीर्घकालीन नियुक्तीची गरज

Nashik Police Transfer News | Game of 'Musical Chairs' in Ambad Police Station! 8 Senior Inspectors transferred in 2 and a half years, need for long-term appointment

#Nashik Police Transfer/ #Ambad Police Station News

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अंबड पोलिस ठाण्यात सतत बदलते नेतृत्व: गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्थिर नेतृत्वाची मागणी

सिडको (नाशिक): Nashik Police Transfer News शहरातील सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यात गेल्या अडीच वर्षांत तब्बल आठ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली झाली आहे. यातील एकाही अधिकाऱ्याचा कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत पोहोचलेला नाही, यामुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण पोलिस वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

Nashik Police Transfer News पदावर सतत बदल – स्थैर्याचा अभाव

राकेश हांडे यांची अवघ्या ४ महिन्यांत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली. पण कड मार्च 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार असल्यामुळे ही नियुक्तीदेखील तात्पुरतीच ठरणार आहे.

अडीच वर्षांत कार्यरत वरिष्ठ निरीक्षकांची यादी व कार्यकाळ:

  • भगीरथ देशमुख – 15 महिने (सर्वाधिक)
  • नंदन बगाडे – दीड महिना
  • युवराज पक्ती – दीड महिना
  • सूरज बिजली – 3 महिने
  • प्रमोद वाघ – 6 महिने
  • दिलीप ठाकूर – 6 महिने
  • सुनील पवार – 7 महिने

कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम

सतत बदलत्या नेतृत्वामुळे स्थानिक गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांचा तपास, आणि समस्या सोडवण्याची योजना यावर परिणाम होतो आहे. प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यशैलीनुसार काम करतो, ज्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कारभारात सातत्य राहात नाही.

मधुकर कड यांचा अनुभव – पण कार्यकाळ मर्यादित

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना पुन्हा अंबड पोलिस ठाण्याच्या जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत गुन्हेगारी नियंत्रणात ठोस कामगिरी केली होती. त्यांनी गुंड टोळ्यांचा बंदोबस्त करत अंबड परिसरात प्रभावी कारवाई केली होती.

पण आता त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्व अवघे काही महिने शिल्लक असल्याने, पोलिस ठाण्यासाठी दीर्घकालीन, अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे तातडीचे ठरत आहे.