तीन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत केली लूट
Nashik – अंबड परिसरातील श्री. ज्वेलर्स या सराफा दुकानात तीन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत सराफा दुकानदार आणि त्यांच्या पत्नीला स्प्रे मारून सोन्याचे दागिने लुटले. या घटनेचा तपास करत गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने मुख्य आरोपीला अटक करून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
काळ्या बुलेटवरून आरोपींचा पलायन
गुन्हेगारांनी चेहऱ्यावर स्प्रे मारल्यानंतर दुकानासमोरील काळ्या रंगाच्या बुलेटवरून घटनास्थळावरून पळ काढला.
Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पथक तपासासाठी सक्रिय झाले.
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध
घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपींची माहिती मिळाली. त्याचदरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की, विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची बुलेट वापरणारा इसम सिन्नर फाटा येथे चोरीचे सोने विक्रीसाठी येणार आहे.
Nashik पोलिसांची कारवाई: आरोपीसह मुद्देमाल जप्त
गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या पथकाने सिन्नर फाटा येथे सापळा रचून आरोपी निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार (वय २५, रा. दत्तनगर, चुंचाळे, नाशिक) याला अटक केली.
जप्त मुद्देमाल:
- गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटारसायकल
- ४४.५८० ग्रॅम सोन्याचे दागिने
- ८७.८७० ग्रॅम चांदीचे दागिने
- एकूण किंमत: ₹५,४०,२२५
इतर साथीदारांचा शोध सुरू
चौकशी दरम्यान, आरोपीने गुन्ह्यात इतर साथीदारांचाही सहभाग असल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलीस त्यांच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत.
Nashik पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.