Nashik Politics | “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो म्हणजे पक्ष सोडतोय असं नाही” – विलास शिंदे यांचा स्पष्टीकरण

mbcMarathi

नाशिक : “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे ३० वर्षांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यांच्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. मी पक्ष सोडत नाही,” असे स्पष्ट शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासमोर स्पष्टीकरण दिले.(Nashik Politics)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

ही प्रतिक्रिया त्यांनी मंगळवारी (दि. १० जून) दिली असून, यामध्ये त्यांनी राजीनामाही सादर केला आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राजकीय पार्श्वभूमी : नाराजी, भेटी आणि चर्चा

आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात नाराजीचे सूर सतत उमटत आहेत. उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर पक्षातील इतर नाराज नेत्यांच्याही चर्चांना वेग आला. बडगुजर यांनी दावा केला होता की विलास शिंदे आणि इतर डझनभर नेते पक्षात नाराज आहेत. त्यानंतर दोनदा उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यामुळे, विलास शिंदे शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.

संजय राऊत यांच्यासमोर खुलासा

विलास शिंदे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन स्वतःच्या भावना स्पष्ट केल्या. ते म्हणाले:

“राऊत साहेबांना माझ्या भावना सांगितल्या. येत्या आठवड्यात नाशिकमध्ये बैठक होणार असून, नाराजीचा विषय पक्षांतर्गत आहे. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि राजकीय घडामोडी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.”

संजय राऊत यांची प्रतिक्रिया : “विलास शिंदे शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता”

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले:

विलास शिंदे हा कट्टर शिवसैनिक आहे. तो शिवसेनेचा पक्का माणूस आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही.

त्यानंतरही काही राजकीय वर्तुळांत या चर्चेला पूर्णविराम लागेल का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

शिंदे यांच्यासमवेत उपस्थित नेते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी नगरसेवक संतोष गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील आणि काही स्थानिक शिवसैनिकही उपस्थित होते.