Nashik Politics News | शिवसेना पक्ष सांभाळण्याची जबाबदारी आता शिवसैनिकांवर – खासदार राजाभाऊ वाजे यांचे वक्तव्य

mbcMarathi

Nashik Shiv Sena News | नाशिकमध्ये शिवसेनेच्या विभागनिहाय बैठका जोरात सुरु

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik Politics News

नाशिक रोड : “मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली, पण आज पक्षच कोणीतरी चोरून नेत आहे,” असे घणाघाती वक्तव्य खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. नाशिक महापालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विभागनिहाय प्रभाग बैठकांना गती दिली असून, पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रभाग क्र. २२ ची बैठक विठ्ठल मंदिर विहीतगाव येथे, तर प्रभाग क्र. १९ ची बैठक चेहेडी येथील हनुमान मंदिरात झाली. या दोन्ही ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर सत्र झाले.

“शिवसेनेचा आत्मा म्हणजे कार्यकर्ते” – वाजे यांचा विश्वास

खासदार वाजे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना मोठे केले, त्यांनीच स्वार्थासाठी पक्ष सोडला. त्यामुळे खरी शिवसेना आता कार्यकर्त्यांच्या हाती आहे, ती त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळली पाहिजे.

उपनेते दत्ता गायकवाड यांनी सामान्य जनतेच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी तत्पर राहण्याचे आवाहन केले. सुनिल बागूल यांनी स्पष्ट केले की, “भाजपने खोटे बोलून व शिवसेनेतील लोकांना फोडून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी तयारीला गती : शिवसेनेचा हल्लाबोल सुरू

जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशीमाजी आमदार वसंत गिते यांनी म्हटले की, “शिवसेना गेली तीन वर्षे निवडणुका घेण्याची मागणी करत होती. मात्र सरकारकडे मताचा पराभव होण्याची भीती होती. आता न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका अटळ आहेत आणि आपल्याला सज्ज व्हावे लागेल.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती: संघटनात्मक ताकदीचे दर्शन

या बैठकीस लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक, भारती ताजनपुरे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल तानपुरे, वैभव ठाकरे, भैया मणियार, मसूद जिलानी, योगेश गाडेकर, माजी महापौर नयन घोलप, संतोष साळवे, सुनिता कोठुळे, अंबादास ताजनपुरे, अरुण जाधव, योगेश भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभागातील कार्यकर्त्यांत विकास गिते, किरण डहाळे, रमेश पाळदे यांचा देखील सक्रीय सहभाग दिसून आला.