Nashik Rain News | नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पहिला पूर, ‘रेड अलर्ट’ जाहीर

MBC MARATHI

२० जून २०२५ | नाशिक हवामान अपडेट

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक पावसाचे थैमान: नाशिक शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी (दि. १९ जून) मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला असून, हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पावसामुळे अनेक नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

मुख्य ठळक बाबी (Rain Highlights Nashik District):

  • ओझर येथे मासेमारी करताना ३६ वर्षीय युवक वाहून गेला, शोधकार्य सुरू
  • दारणा धरणातून ११०० क्यूसेक, पुनद धरणातून १२०० क्यूसेक, आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३२२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
  • घाटमाथ्यावरील तालुक्यांत अतिवृष्टी: पेठ १२२ mm, त्र्यंबकेश्वर ११७ mm, सुरगाणा १०१ mm
  • नद्यांना पूर – कादवा, म्हाळुंगी, बाणगंगा, कोलमण, शहानूर यासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत
  • कसारा घाटात वाहतूक संथ, अनेक गावांचा संपर्क तुटला

नाशिकमध्ये पूरस्थिती आणि धरण विसर्ग अपडेट (Nashik Flood Alert Today):

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे धरणांचा जलसाठा वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, दारणा, नांदूरमध्यमेश्वर, पुनद व पालखेड धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

विसर्गाचा तपशील (Dam Discharge in Cusec):

धरणविसर्ग (cusec)
पुनद धरण1200
दारणा धरण1100
नांदूरमध्यमेश्वर बंधारा3228

दारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नुकसान आणि बचाव कार्य

  • ओझरमध्ये विठ्ठल शिंगाडे (३६) नामक युवक मासेमारी करताना वाहून गेला; ओझर नगरपालिकेकडून शोध सुरू.
  • सुरगाण्यातील उदमाळ गावात घराचे नुकसान.
  • बागलाण, निफाड, सिन्नर, कळवण भागातही जोरदार पावसाची नोंद.

वाहतूक आणि संपर्क तुटलेले मार्ग

  • कसारा घाटात वाहनांची संथ वाहतूक.
  • फरशी पूल पाण्याखाली गेल्याने काही वस्त्यांचा संपर्क तुटलेला.
  • काही भागांत शेतकरी व ग्रामस्थ पाण्यात अडकले असल्याच्या घटना.