Nashik Rain Water Crisis | नाशिकमध्ये मुसळधार पावसातही पाणीबाणीचा धोका कायम!

Nashik Rain Water Crisis | The threat of water crisis continues in Nashik despite heavy rains!

तीसऱ्या दिवशीही नाशिककरांना कोरडे नळ; गंगापूर जलवाहिनी पुन्हा फुटली

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक (Rain News Nashik): Nashik Rain Water Crisis नाशिकमध्ये आकाशातून संततधार सुरू असतानाही, महापालिकेच्या अपयशी नियोजनामुळे नागरिकांना सलग तिसऱ्या दिवशी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथील ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती पुन्हा अपयशी ठरली, ज्यामुळे शहराचा ७०% भाग सोमवारीही कोरडाच राहिला.

Nashik Rain Water Crisis पाणीपुरवठा बंदीचं कारण काय?

शनिवारी (दि. 21) महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या संयुक्त नियोजनातून शहरात शटडाउन घेण्यात आला.
बारा बंगला ते नीलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र जोडणारी जलवाहिनी जुन्या गंगापूर पंपिंग येथे लीकेज झाल्याने रविवारी (दि. 22) पहाटे साडेपाचपर्यंत दुरुस्ती सुरू होती. मात्र, दुरुस्तीच्या चाचणीवेळी ती पुन्हा फुटली, आणि मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले.

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत – कोणते भाग प्रभावित?

  • सिडको व इंदिरानगर वगळता संपूर्ण शहरात पाणीपुरवठा ठप्प
  • गंगापूर धरणावरून होणारा पाणीपुरवठा सोमवारी बंद
  • तीसऱ्या दिवशी देखील नागरिकांना कोरडे नळ

पुन्हा सुरु दुरुस्तीचे प्रयत्न

गेल्या तीन दिवसांपासून जुने पंपिंग स्टेशन परिसरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. सोमवारी उशिरापर्यंत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जलवाहिनी दुरुस्तीत गुंतले होते. मात्र, जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने स्थायी उपाययोजना न केल्यास पुढील दिवसांमध्येही पाणीबाणीचे संकट टळणे कठीण आहे.

नागरिकांचा संताप वाढतोय

  • पावसाळ्याच्या तोंडावर शहरातच पाणीबाणी
  • सोशल मीडियावर नागरिकांचा संतप्त प्रतिसाद
  • महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर टीका