Nashik : राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२४ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर कारवाया करून मद्याच्या अवैध वाहतुकीला चाप लावला. वर्षभरात २,५८९ गुन्हे दाखल करत २,६०७ संशयितांना अटक करण्यात आली. विभागाने सुमारे ७ कोटी ८३ लाख ३५७ रुपयांचा मद्यसाठा व वाहने जप्त केली आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अगदी चार महिन्यांच्या अंतराने पार पडल्या. या काळात नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी अवैध मद्य वाहतूक आणि विक्रीवर लक्ष केंद्रित केले.
Nashik दिंडोरीत सर्वाधिक ३९ गुन्हे, तर त्र्यंबक-इगतपुरीत ३६ आणि सिन्नरमध्ये ३१ गुन्हे दाखल झाले. कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ४२,३६२.८१ बल्क लिटर मद्यसाठ्याचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान तस्करांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला जाणूनबुजून धडक देत कर्मचारी कैलास कसबे यांचा मृत्यू घडवून आणला. यानंतर पोलिस आणि विभागाने आक्रमक पवित्रा घेत, अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला.
जप्त मुद्देमालाची किंमत: ७ कोटी ८३ लाख
दाखल गुन्हे: २,५८९,अटक संशयित: २,६०७,जप्त वाहने: १५७
नाशिक पूर्व, पश्चिम, मालेगाव बाह्य, चांदवड, सिन्नर, दिंडोरी आणि त्र्यंबक-इगतपुरी मतदारसंघांमध्ये विभागाने छापेमारी करत हातभट्टी उद्ध्वस्त केली. ग्रामीण पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवून संशयितांना बेड्या ठोकल्या.