नाशिक रोड कारागृहात कायदेविषयक शिबीर

Nashik road Karagruhat kayde vishayakshibir

नाशिक रोड, प्रतिनिधी :तालुका विधी सेवा समिती, नाशिक रोड दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह यांच्यातर्फे कारागृहात न्यायाधीन बंदींसाठी कायदेविषयक शिबीर उत्साहात झाले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिकरोड न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला, सहन्यायाधीश मेश्राम, नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुदाम गायकवाड, ॲड. उमेश साठे यांनी मार्गदर्शन केले. कारागृहाच्या अधिक्षक अरूण मुगूटराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास ॲड. प्रकाश गायकर, ॲड. बी. बी. आरणे, ॲड. दमयंती दोंदे, ॲड. प्रमोद कासार, ॲड. रामदास आहेर, ॲड संजयकुमार मुठाळ, ॲड. अविनाश भोसले, ॲड. दीपक बर्वे, ॲड. धम्मपाल रुपवते, ॲड. केशव खैरे आदी वकील सदस्य उपस्थित होते. नाशिकरोड बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी न्यायाधीन बंदींचे कायदेशीर हक्क, कर्तव्य, जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले. बंदीजनांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिका-यांनी, कायदे तज्ञांनी योग्य उत्तरे देऊन शंका समाधान केले.

Leave a Reply