जयभवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि योगदर्शन योग केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा झाला. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे कार्याध्यक्ष किशोर जाचक, सचिव सुभाष पाटोळे, योग गुरू विश्व विक्रमवीर बाळासाहेब मोकळ यांनी उदघाटन केले. या मंदिरात बाळासाहेब मोकळ यांचे वडील धोंडीराम मोकळ यांच्या स्मृतीनिमित्त मोफत योग शिबीर सुरु झाले. ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी पावणे सहा ते सात या वेळेत हे शिबीर चालणार आहे. शिबिरात रोज वेगवेगळी आसने, प्राणायाम, योगमुद्रा शिकविल्या जात असून विविध व्याधींवर योगप्रक्रिया कशा उपयुक्त ठरू शकतात, आहार विहार, दिनचर्या, शरीर व मन स्वास्थ्य कसे चांगले ठेवायचे याची माहिती तज्ज्ञ देत आहेत. पहिल्या दिवशी मेघा बोडके यांनी गुरुवंदना म्हटली. शिल्पा भावसार यांनी योगशास्त्राची तर दिपाली कोठुळे यांनी रथसप्तमीची माहिती दिली. नलिनी कड यांनी प्रास्ताविक केले. गायत्री मोकळ, मेघा बोडके, नलिनी कड यांनी योग गीत म्हटले. योग गुरु बाळासाहेब मोकळ यांनी सूर्यनमस्कार करून घेतले. योग शिक्षिका श्रुती पाटोळे, सुप्रिया गुसाई, सविता सोनवणे, प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिके केली. विजयालक्ष्मी राऊत यांनी सूत्रसंचालन केले. योग केंद्राचे धनंजय शेटे, सुधीर कुलकर्णी, रोहिणी थोरात, लोकेश सोनी, ज्ञानेश्वर राऊत, विजयालक्ष्मी राऊत, शितल सोनटक्के, अश्विनी पुरी, शिल्पा भावसार, माधुरी निकम आदींनी संयोजन केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.