Nashik Parking Update | Smart Parking Nashik | Nashik Traffic Problem | Nashik Smart Parking News
नाशिक : शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे गंभीर झालेली वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने ‘स्मार्ट पार्किंग योजना’ पुन्हा एकदा मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ४ ऑगस्टपर्यंत योजनेवर स्थगिती होती. मात्र, स्थगितीची मुदत संपताच विधी विभागाच्या सल्ल्यानुसार निविदा फेरप्रसिद्ध करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.
ठळक बाबी :
- वाहनतळांची संख्या ३५ वरून कमी करून आता २८ करण्यात आली
- ठेकेदारांकडून घेतली जाणारी रक्कम ३५ लाखांवरून कपात
- २२ ऑन-स्ट्रीट व ६ ऑफ-स्ट्रीट पार्किंग स्थळांची अंतिम निवड
- ४,८६५ वाहने एकत्र पार्क करण्याची होणार सोय
वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेची पावले
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वाहतूक नियंत्रण करणे हे मोठे आव्हान आहे. शहरातील मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त अनेक भागांत पार्किंगची अडचण जाणवते. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट पार्किंग योजनेला पुन्हा चालना देण्यात आली आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात ३५ पार्किंग स्पॉट मंजूर झाले होते. मात्र, कोरोना काळात अंमलबजावणीत अडथळे आले.
आता आयुक्त मनीषा खत्री यांनी नव्या जोमाने योजना पुढे रेटली आहे. वाहनतळासाठी शहरात २२ ऑन-स्ट्रीट व ६ ऑफ-स्ट्रीट अशी एकूण २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ही पार्किंग स्पॉट्स नो-पार्किंग झोनपासून योग्य अंतरावर असतील.
निविदा फेरप्रसिद्धीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू (Nashik Smart Parking News)
स्मार्ट सिटी प्रकल्पातील जुन्या ठेकेदाराने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्याने महापालिकेने तात्पुरती स्थगिती पाळली होती. आता न्यायालयाकडून पुढील आदेश न मिळाल्याने, महापालिकेने स्थगिती उठल्याचे गृहीत धरून विधी विभागाच्या सल्ल्यानुसार नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित फाईल महापालिकेच्या विधी विभागाकडे पाठविण्यात आली आहे. ॲड. सारीका शहा यांच्या सल्ल्यानुसार पुढील पावले उचलली जातील.
नवीन स्मार्ट पार्किंग योजनेचे फायदे :
- पार्किंगसाठी ठराविक जागा उपलब्ध होणार, अनधिकृत पार्किंगला आळा
- वाहतुकीला गती मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल
- नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहनतळांची उपलब्धता
- सिंहस्थ २०२७ पूर्वी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यास मदत