नाशिक – महापालिकेच्या वॉटरग्रेस कंपनीचा कंत्राटी सफाई कर्मचारी आकाश उर्फ शुभम धनवटे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या प्रकरणात भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याचे नाव समोर आले आहे. संशयितांची नावे आहेत – अथर्व दाते (२०, रा. घारपुरे घाट), अभय तुरे (१९, रा. रविवार पेठ) आणि मकरंद देशमुख. या घटनेनंतर धनवटेच्या भाऊ मकरंद उर्फ सोमा धनवटेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी पहाटे सहा वाजता पंडित कॉलनीतील बालगणेश उद्यान परिसरात धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानंतर धनवटे गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी पेठ परिसरात तपास चालवून काही तासात संशयितांना पकडले.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, अधिक तपास सुरु आहे.