नाशिकमध्ये व्यापाऱ्यांना तडीपार गुंडाचा त्रास, पोलिसांची तातडीने कारवाईची मागणी

Nashik Traders Harassed by Exiled Goon, Demand Immediate Police Action

नाशिक : व्यापाऱ्यांना तडीपार गुंडाचा त्रास, पोलिस कारवाईची मागणीनाशिकरोड परिसरातील सुभाष रोडवर व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली व्यापार करत असून, तडीपार गुंडाच्या धमक्यांमुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राजधानी जनरल स्टोअर्स या दुकानाचे मालक गोपाल किसनानी यांनी असेच धोक्याचे अनुभव सांगितले आहेत. त्यांच्या मते, सन्नी भाटिया नावाचा तडीपार गुंड सतत हप्त्याची मागणी करत आहे आणि पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गोपाल किसनानी यांचे सुभाष रोडवरील के बी एन मार्केटमध्ये होलसेल दुकान असून, गेल्या काही काळापासून सन्नी भाटिया त्यांना वेळोवेळी धमकावत आहे. भाटियाने नुकतेच दुकानात येऊन कोयत्याचा धाक दाखवून ५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. व्यापाऱ्यांच्या मते, या गुंडाच्या त्रासामुळे त्यांचे कामकाज मोठ्या अडचणीत आले आहे.

गोपाल किसनानी यांनी यापूर्वीही भाटियाच्या त्रासाबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांची योग्य ती कारवाई न झाल्याने भाटिया वारंवार त्रास देत राहिला. २६ सप्टेंबर रोजी भाटियाने पुन्हा धमकावले आणि पैसे न दिल्यास जीव घेतल्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकानात येऊन हप्त्याची मागणी केली.

या घटनेच्या चार दिवसांनंतर गोपाल किसनानी यांनी पुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सनी भाटिया याला अटक केली असून, विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

Leave a Reply