बिडी कामगार परिसरात हादरवून टाकणारी घटना • परिसरात शोककळा, कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
नाशिक : Nashik Tragedy शहरातील बिडी कामगार परिसरात एक दु:खद आणि हादरवून टाकणारी घटना घडली असून, कृत्रिम तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
या तीनही मुलांचे कालपासून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले होते. शोधमोहीम दरम्यान तलावाच्या काठावर त्यांचे कपडे सापडल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
बांधकामासाठी तयार केलेल्या तलावात दुर्दैवी मृत्यू (Nashik Tragedy)
सदर कृत्रिम तलाव बांधकाम साईटवरील पाणीसाठ्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांचा पाय घसरल्याने पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शेजारी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या आडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.