Nashik -त्र्यंबक रस्त्यावर दुचाकीची एसटी बसला धडक दुचाकी चालकाचा मृत्यू; एकजण जखमी

नाशिक: अपघात प्रकरणात २० वर्षीय तनया वाघ दोषी; ५० हजार रुपयांची नुकसानभरपाईचे आदेश

Trimbakeshwar : संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेची मोठी गर्दी असतानाही भरधाव वेगात असलेल्या हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकीने (क्र. एम. एच.१५ सीबी ३४१९) समोरून येणाऱ्या एसटी बसला (क्र. एम.एच. क्र. ४० वाय ५६५४) समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक प्रतीक चंद्रकांत चव्हाण (रा. दुडगाव, महिरावणी) यांचा जागेवर मृत्यू झाला. तर आदित्य सावंत (रा. पाथर्डी) फाटा याचा हात फॅक्चर झाला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून खासगी वाहनातून नाशिक येथे हलविण्यात आले आहे. उपचारासाठी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

दोघेही Nashik येथील गुरू गोविंदसिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्र्यंबकपासून एक कि.मी. अंतरावर शासकीय विश्रामगृहासमोरील उतारावर वीज वितरण स्टेशनसमोर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला. शनिवारी श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा असल्याने शुक्रवारी रस्त्याच्या एक बाजूने दिंड्यांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे काही ठिकाणी डिव्हायडरच्या एकाच बाजूने वाहने ये-जा करीत असतात. बस विरुद्ध बाजूने येत असताना दुचाकीने बसला धडक दिल्याने दुर्घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विठ्ठल काळे यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले. पोलिस हवालदार घायवट, पोलिस शिपाई श्रावण साळवे उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. सचिन गांगुर्डे यांनी पंचनामा केला.